नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भद्रकाली पोलीस ठाणे हददीत एकाच रात्री वेगवेगळया ठिकाणी घरे व वाहनांची जाळपोळ करणाऱ्या आरोपींनी पोलिसांनी गजाआड केले आहे. भद्रकाली पोलीस स्टेशन हहद्दीत १६ मे रोजी मध्यरात्री वाकडी बारव, जाकीर हुसेन हॉस्पीटल समोर, नानावली, शितळा देवी मंदीरासमोर अशा चार ठिकाणी अज्ञात इसमांनी ९ मोटर सायकल, एक ट्रक, एक टेम्पो, यांना आग लावुन जाळपोळ केली होती. तसेच जहांगीर कब्रस्तान जवळील एका घरावर पेटलेली बाटली फेकुन घर जाळण्याचा प्रयत्न केल्याने भद्रकाली पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे.
या गुन्हयात आरोपी सनी संजय गावडे, वय २८ वर्षे रा. पिपंळे गल्ली, म्हसरूळ, नाशिक, प्रशांत बाळासाहेब फड, वय ३१ वर्षे रा. विदयानगर, मखलाबाद, म्हसरूळ, नाशिक, प्रविण बाळु कराटे, वय २४ वर्षे रा. विदयानगर, मखलाबाद, म्हसरूळ, नाशिक, आकाश राजु सांळुके, वय २४ वर्षे रा. दत्त चौक, सिडको नाशिक, विजय सुरेश लोखंडे, वय २८ वर्षे रा. आडगांव नाशिक यातील आरोपी क १ ते ३ यांना शनिशिंगनापुर येथून सापळा लावून ताब्यात घेण्यात आले. आरोपी क. ४ व ५ यांना नाशिक शहरातुन रात्रीचे अंधारातून ताब्यात घेऊन त्यांचेकडे कसोशीने तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा हा दहशत करण्याचे हेतुने केला असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न होत असून त्यांना सदर गुन्हयात अटक करून यामध्ये त्यांचे अजुन कोणी साथीदार आहेत किंवा कसे? याबाबत वरीष्ठांचे मागदर्शानाने गुन्हयाचा सविस्तर तपास विक्रम मोहीते, पोलीस निरीक्षक (प्रशासन) हे करीत आहेत.
सदरचा गुन्हा हा भद्रकाली पोलीस ठाणे हददीत असलेली कायदा व सुव्यव्यस्था बिघडवण्यासाठी केल्याचे प्रथम दर्शनी दिसुन येत असल्याने अशा संवेदनशील गुन्हयातील अज्ञात आरोपीतांची तात्काळ माहीती घेऊन व त्यांचा शोध घेऊन अटक करणेबाबत संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१, डॉ. सिध्देश्वर धुमाळ, सहा. पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग, नाशिक शहर यांनी मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील व पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष नरूटे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) विक्रम मोहीते यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि /सत्यवानपवार व त्यांचे सोबत असलेले पोलीस पथकाने वरील नमुद संवेदनशील गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा कोणताही ठावठिकाणा नसतांना गुन्हा घडल्यापासुन अतिशय कौशल्यपुर्ण पध्दतीने मानवी व तांत्रिक साधनांचा वापर करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.