नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सोशल मिडीयावर झालेल्या मैत्रीतून एकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्रामवरील फोटोच्या माध्यमातून ब्लॅकमेल करीत संशयिताने हे कृत्य केले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशवंत भुजबळ (रा.राहूलवाडी,पेठरोड) असे संशयिताचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचे रूपांतर दोघांच्या मैत्रीत झाले होते. गेल्या जानेवारी महिन्यात दोघे एकमेकांना भेटले. यावेळी संशयिताने मुलीचा इस्टाग्रामवरील व स्व:ताचा एकत्रीत फोटो दाखवून तिला ब्लॅकमेल करीत राहूलवाडीतील एका घरात घेवून जात बळजबरीने बलात्कार केला.
यानंतरही पेठरोड व फुलेनगर भागात घेवून जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेत मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रायकर करीत आहेत.