इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ बोट उलटून एडीआरएफ पथकातील चार जणांसह एक स्थानिक बुडल्याची घटना घडली आहे. प्रवरा नदीत बुडालेल्या एका व्यक्तीचा शोध घेण्यासाठी हे पथक गेले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. एडीआरएफ पथकातील पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, पुणे, पोलिस शिपाई वैभव वाघ, भडगाव, पोलिस शिपाई राहुल पावरा, शिरपुर येथील आहे. यांची नेमणुक राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे येथे होती. या घटनेत एसडीआरएफच्या या तिघांचा मृत्यू झाला आहे.
माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेबाबत प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी दिलेली माहिती अशी की, काल नदीपात्रात दोन जण बुडाले. त्यातील एकाचा मृतदेह सापडला तर दुस-याचा मृतदेह शोधण्यासाठी एसडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले होते. सकाळी सहा वाजेपासून शोधकार्य सुरु करण्यात आले. यावेळी दुर्दैवाने एसडीआरएफडची बोट पाण्यात बुडाली. त्यात पाच जण बुडाले. तिघांचा मृत्यू झाला आहे. एकाला उपचारासाठी रुग्णालायता दाखल करण्यात आले तर एकाचा शोध सुरु आहे.