इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात शुभम सदाशिव पवार (२४) या तरुणाने आरक्षणसाठी आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्टी लिहली असून त्यात माझं बलिदान वाया जाऊ देऊ नका असे लिहत आत्महत्या केली आहे. तीन दिवसांपूर्वीच सुनील कावळे या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना याच मागणीसाठी शुभमने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
मुंबईवरून परत गावाकडे येत असताना विष पिऊन अर्धापूर गावाजवळ त्याने ही आत्महत्या केली. शनिवारी रात्री ८ वाजता ही घटना उघडकीस आली. तामसा रोडवरील एका मंगल कार्यालय परिसरातील झाडीत त्याचा मृतदेह आढळून आला. शुमम हा गेल्या काही महिन्यापासून मुंबईमध्ये राहत होता. तिथे शिक्षण आणि प्लब्मरचे काम करत होतो. शनिवारी तो दिवाळी सणासाठी मुबईहून नांदेडकडे येत असतांना त्याने हे गंभीर पाऊल उचलले.
शुभमने लिहलेली चिठ्ठी ही भावनिक आहे, त्यात त्याने म्हटले आहे, मराठा आरक्षण भेटण्यासाठी मी माझ्या जीवाचे बलिदान देत आहे. माझे बलिदान वाया जाऊ नये…एक मराठा लाख मराठा असे नमूद केले आहे. राज्यभर मराठा आरक्षणासाठी आंदोलन पेटलेले असतांना दोन तरुणांनी आपले जीवन संपवले. त्यामुळे आता आरक्षणाचा विषय आता गंभीर वळणावर आलेला आहे.