इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात एका महिलेच्या विवस्त्र होऊन धावण्याच्या प्रकरणात भाजपचे आमदार अडचणीत आले आहे. आमदारांच्या पत्नी व इतरांवर यासंदर्भात गुन्हे दाखल झाले असून पोलीस पुढील तपास करीत आहे.
जमिनीच्या वादातून एक महिला विवस्त्र अवस्थेत धावत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आष्टी तालुक्यातील वाळुंज या ठिकाणी हा प्रकार घडला होता. जी महिला विवस्त्र होऊन धावत आहे त्या पीडित महिलेचे कुटुंब मागच्या काही दिवसापासून ही शेतजमीन वाहत आहे. मात्र, इतर दोघांनी सुद्धा त्या जागेवर आपली मालकी असल्याचा दावा केला आहे. दोन दिवसांपूर्वी याच वादातून या ठिकाणी भांडण झाले आणि याच भांडणानंतर ही महिला एका पुरुषाच्या मागे विवस्त्र होऊन धावताना पाहायला मिळत आहे.
वाद सोडवण्यासाठी भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस त्या ठिकाणी गेल्या होत्या. प्राजक्ता धस त्या ठिकाणी गेल्यानंतरही तो वाद वाढत गेला. पीडित महिलेच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर भाजपाचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह दोघांच्या विरोधात विनयभंगाचा आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत असून यामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बायकोचा नकार, पतीची आत्महत्या
माहेरी गेलेली बायको घरी परत यायला तयार नसल्याने नैराश्यात गेलेल्या पतीने आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली. आष्टी तालुक्यातील पती अण्णाराव हे पत्नीला आणण्यासाठी भोजेवाडी या गावी गेले होते. सासुरवाडीला गेल्यावर सासरच्या लोकांनी अण्णाराव यांना शिवीगाळ केली. अण्णाराव यांना अपमानित झाल्यासारखे वाटले. पत्नीच्या नातेवाईकांनी केलेली शिवीगाळ अण्णाराव यांना चांगलीच जिव्हारी लागली. ते घरी आले आणि विषारी द्रव पिऊन आत्महत्या केली.