इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघात अंतिम मतदानाचा आकडा समोर आला आहे. या मतदार संघात ६०.७५ टक्के मतदान झाले आहे. २० लाख ३० हजार १२४ मतदानापैकी १२ लाख ३३ हजार ३८३ मतदारांनी येथे हक्क बजावला आहे. आता या मतदानातून कोण जास्त मते घेतो यावर त्याचा विजय निश्चित होणार आहे. नाशिकमध्ये तिरंगी लढत असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यात शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे, ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे व अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यात मुख्य लढत आहे. या लढतीमध्ये विधानसभानिहाय मतदानावरही बरंच काही अवलंबून आहे.
नाशिक लोकसभेत सहा विधानसभा मतदार संघ आहे. त्यात सिन्नर विधान मतदार संघात ३ लाख ६ हजार ५३३ मतदान होते. त्यापैकी २ लाख १३ हजार ४५ मतदान झाले. नाशिक पूर्व विधान मतदार संघात ३ लाख ८८ हजार ४८५ मतदान होते. त्यापैकी २ लाख १५ हजार १५२ मतदान झाले. नाशिक मध्य विधान मतदार संघात ३ लाख २८ हजार ५४ मतदान होते. त्यापैकी १ लाख ८७ हजार ४९१ मतदान झाले. नाशिक पश्चिम विधान मतदार संघात ४ लाख ५६ हजार ९६ मतदान होते. त्यापैकी २ लाख ४७ हजार ८९६ मतदान झाले. देवळाली विधान मतदार संघात २ लाख ७६ हजार ९०२ मतदान होते. त्यापैकी १ लाख ७१ हजार ८२४ मतदान झाले. इगतपुरी विधान मतदार संघात २ लाख ७४ हजार ५४ मतदान होते. त्यापैकी १ लाख ९७ हजार ९७५ मतदान झाले आहे.
सिन्नर विधानसभा मतदार संघात राजाभाऊ वाजे यांची मोठी आघाडी असणार आहे. तर इगतपुरी विधानसभा मतदार संघातही ते चांगली मते घेणार आहे. उर्वरीत चार मतदार संघात ते किती मते जास्तीचे घेतात यावर त्यांचा विजय निश्चित आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना गेल्या निवडणुकीत जी मते मिळाली होती. त्यात ब-याच ठिकाणी नुकसान झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांची सर्व मदार ही भाजप, मनसे व राष्ट्रवादी अजित पवार गटावर आहे. शिंदे गटाची ताकद या मतदार संघात अदयाप फारशी नाही. त्याचप्रमाणे त्यांना मानणारा मतदारही आहे. तर तिसरीकडे शांतीगिरी महाराज यांच्या बादलीने या दोघांचे गणित बिघडवले आहे. त्याचा फटका आता गोडसे यांना बसतो की राजाभाऊला हे अद्याप स्पष्ट नाही. एकुणच विधानसभा निहाय मतदानावर आकडेमोड केल्यानंतर ही निवडणूक स्पष्ट लक्षात येते…
नाशिकच्या चारही विधानसभा मतदार संघात समीश्र मतदान झाले आहे. त्यात काही ठिकाणी गोडसे तर काही ठिकाणी वाजे आघाडीवर आहे. या मतदार संघात शांतीगिरी महाराजांचे सुप्त मतदान फारसे समोर येत नाही. त्यामुळे येथील आघाडी व टक्केवारीवर बरंच काही अवंलबून असणार आहे. एकुणच या मतदार संघात तिरंगी लढतीमुळे थेट कोण निवडणून येईल हे सांगणे सर्वांसाठी अवघड असेच आहे.