इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघात अंतिम मतदानाचा आकडा समोर आला आहे. या मतदार संघात ६०.७५ टक्के मतदान झाले आहे. २० लाख ३० हजार १२४ मतदानापैकी १२ लाख ३३ हजार ३८३ मतदारांनी येथे हक्क बजावला आहे. त्यात ६ लाख ७२ हजार ५७५ पुरुष तर ५ लाख ६० हजार ७७० महिलांना हक्क बजावला आहे.
या लोकसभा मतदार संघात विधानसभा निहाय आकडे सुध्दा समोर आले आहे. त्यात
सिन्नर विधान मतदार संघात ३ लाख ६ हजार ५३३ मतदान होते. त्यापैकी २ लाख १३ हजार ४५ मतदान झाले. ही टक्केवारी ६९.५० टक्के होती.
नाशिक पूर्व विधान मतदार संघात ३ लाख ८८ हजार ४८५ मतदान होते. त्यापैकी २ लाख १५ हजार १५२ मतदान झाले. ही टक्केवारी ५५.३८ टक्के होती.
नाशिक मध्य विधान मतदार संघात ३ लाख २८ हजार ५४ मतदान होते. त्यापैकी १ लाख ८७ हजार ४९१ मतदान झाले. ही टक्केवारी ५७.१५ टक्के होती.
नाशिक पश्चिम विधान मतदार संघात ४ लाख ५६ हजार ९६ मतदान होते. त्यापैकी २ लाख ४७ हजार ८९६ मतदान झाले. ही टक्केवारी ५४.३५ टक्के होती.
देवळाली विधान मतदार संघात २ लाख ७६ हजार ९०२ मतदान होते. त्यापैकी १ लाख ७१ हजार ८२४ मतदान झाले. ही टक्केवारी ६२.०५ टक्के होती.
इगतपुरी विधान मतदार संघात २ लाख ७४ हजार ५४ मतदान होते. त्यापैकी १ लाख ९७ हजार ९७५ मतदान झाले. ही टक्केवारी ७२.२४ टक्के होती.