इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिंडोरी लोकसभा मतदार संघात अंतिम मतदानाचा आकडा समोर आला आहे. या मतदार संघात ६६.७५ टक्के मतदान झाले आहे. १८ लाख ५३ हजार ३८७ मतदानापैकी १२ लाख ३७ हजार ३८९ मतदारांनी येथे हक्क बजावला आहे. त्यात ६ लाख ७९ हजार ३९९ पुरुष तर ५ लाख ५७ हजार ७७७ महिलांना हक्क बजावला आहे.
या लोकसभा मतदार संघात विधानसभा निहाय आकडे सुध्दा समोर आले आहे. त्यात
नांदगाव विधान मतदार संघात ३ लाख ३२ हजार ५१२ मतदान होते. त्यापैकी १ लाख ९३ हजार ६५७ मतदान झाले. ही टक्केवारी ५८.२४ टक्के होती.
कळवण विधान मतदार संघात २ लाख ९४ हजार ३ मतदान होते. त्यापैकी २ लाख ८ हजार ४२० मतदान झाले. ही टक्केवारी ७०.८९ टक्के होती.
चांदवड विधान मतदार संघात २ लाख ९९ हजार ३०४ मतदान होते. त्यापैकी १ लाख ९९ हजार ४९७ मतदान झाले. ही टक्केवारी ६६.६५ टक्के होती.
येवला विधान मतदार संघात ३ लाख १४ हजार ५५१ मतदान होते. त्यापैकी २ लाख ५ हजार ६६९ मतदान झाले. ही टक्केवारी ६५.३८ टक्के होती.
निफाड विधान मतदार संघात २ लाख ९१ हजार ४५९ मतदान होते. त्यापैकी १ लाख ८७ हजार ४२५ मतदान झाले. ही टक्केवारी ६४.३१ टक्के होती.
दिंडोरी विधान मतदार संघात ३ लाख २१ हजार ५५८ मतदान होते. त्यापैकी २ लाख ४२ हजार ५१२ मतदान झाले. ही टक्केवारी ७५.४२ टक्के होती.