नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दिंडोरीनाका भागात लहान मुलांना खेळण्यास मज्जाव केल्याने एकीने दुस-या महिलेस वजन काट्यातील लोखंडी माप फेकून मारल्याची घटना घडली. या घटनेत भाजीपाला विक्री करणारी महिला जखमी झाली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गुंबाडे बाई (रा.रविवार कारंजा) असे वजन माप फेकून मारणाºया महिलेचे नाव आहे. याबाबत ज्योती अमोल गणोरे (रा.संजयनगर,वाघाडी) या महिलेने फिर्याद दिली आहे. संशयित व फिर्यादी महिला दिंडोरीनाका भागात टॅक्सी युनियन ऑफिस परिसरात उघड्यावर भाजापाला विक्रीचा व्यवसाय करतात. रविवारी (दि.१९) रात्रीच्या सुमारास तेथे लावलेल्या हातगाडीवर काही लहान मुले खेळत होते. त्यांना टोकल्याने ही घटना घडली.
गणोरे यांनी हातगाडीवर खेळू नका दगडावर पडाल असा सल्ला दिल्याने संतप्त महिलेने तिला वजन काट्यातील लोखंडी वजनी माप फेकून मारले. या घटनेत गणोरे जखमी झाल्या असून अधिक तपास हवालदार सोर करीत आहेत.