इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे: पुण्यात कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारखाली दोघांना चिरडणाऱ्या वेदांत अग्रवालला दोन तासांत जामीन मंजूर केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत पोलिस आयुक्तांना निलंबित केले पाहिजे अशी मागण केली आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देतांना ते म्हणाले की, पोलिस आयुक्तांना निलंबित केले पाहिजे. त्यांनी आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. एका दोन जणांचा मृत्यू झाला आणि आरोपीला दोन तासांत जामीन मंजूर झाला. व्हिडिओमध्ये, ते पाहू शकतात. तो नशेत होता, पण त्याचा मेडीकल रिपोर्ट निगेटिव्ह आला की, हे पोलीस आयुक्त कोण आहेत, त्याला हटवावे की रस्त्यावर उतरावे? असे त्यांनी म्हटले आहे.
विशाल अग्रवालला अटक
या प्रकरणात पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे छत्रपती संभाजीनगर परिसरात अटक केली आहे. कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारखाली दोघांना चिरडणाऱ्या वेदांत अग्रवाल याचे ते वडील आहे. पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालवर गु्न्हा दाखल केला होता. त्यानंतर तो फरार झाला.
आणखी एक गुन्हा दाखल
मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवायला दिल्यामुळे मोटर वाहन अधिनियमाच्या कलम ३, ५ आणि १९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगा दारू पितो हे ठावूक असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दल विशालवर बाल न्याय अधिनियमनाच्या कलम ७५ आणि ७७ अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॅाटेल मालकांविरुध्दही गुन्हा दाखल
वेदांत ज्या हॉटेलमध्ये दारु प्यायला, त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाला मद्य देणारे हॉटेल काझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..