इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे छत्रपती संभाजीनगर परिसरात अटक केली आहे. कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारखाली दोघांना चिरडणाऱ्या वेदांत अग्रवाल याचे ते वडील आहे. पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालवर गु्न्हा दाखल केला होता. त्यानंतर तो फरार झाला.
मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवायला दिल्यामुळे मोटर वाहन अधिनियमाच्या कलम ३, ५ आणि १९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगा दारू पितो हे ठावूक असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दल विशालवर बाल न्याय अधिनियमनाच्या कलम ७५ आणि ७७ अंतर्गत आखणी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेदांत ज्या हॉटेलमध्ये दारु प्यायला, त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाला मद्य देणारे हॉटेल काझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..