इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान सध्या प्रचंड चर्चेत आहे. सुमारे गेल्या ३ दशकांपासून आमिर खान चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. त्याने आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. अनेक हिट चित्रपट देणाऱ्या आमिर खानचा ट्रॅक गेल्या काही काळात थोडासा खराब झाला असला तरी, आमिर खानची एकूण कारकीर्द उत्कृष्ट आहे. म्हणूनच त्याला इंडस्ट्रीचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जाते.
मात्र, आता अभिनेत्याने चाहत्यांना एक वेगळाच धक्का दिला आहे. अभिनेत्याने मुंबई सोडून चेन्नईला जाण्याचा निर्णय घेतला आहे.
आमिर आई झीनतवर उपचार सुरू असलेल्या मेडिकल सेंटरच्या जवळ असलेल्या हॉटेलमध्ये राहणार आहे. आमिरला अभिनय व चित्रपटांची निर्मिती करण्याव्यतिरिक्त त्याच्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायचा असल्यामुळे तो चेन्नईत शिफ्ट होणार आहे.
आमिर खान याने असा अचानक मुंबई सोडण्याचा निर्णय का घेतल्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. पण, आमिर खान कायमचा नव्हे, तर काही काळासाठीच चेन्नईला जाणार असल्याचे कळाल्यानंतर मात्र त्यांना हायसे वाटले. आमिर खानची आई सध्या चेन्नईत असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत आमिरलाही तिच्यासोबत वेळ घालवायचा असल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला. आमिर कामासोबतच आपल्या कुटुंबालाही नेहमी वेळ देताना दिसतो. त्यामुळे आमिर पुढचे २ महिने त्या ठिकाणी राहू शकतो. आमिर खान हा ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटात शेवटचा दिसला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपटला होता. त्यानंतर त्याने अभिनयातून ब्रेक घेतला होता. अलीकडेच आमीरने त्याच्या आगामी ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर जिनिलीया देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे.