सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बागलाण तालुक्यातील अंबासनच्या मोराणे सांडस शिवारात एका शेतक-याच्या कांदा चाळीत बिबट्याचे बछडे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हे बछडे मादी पासून चुकल्याने आश्रयासाठी कांदा चाळीत आल्याचे बोलले चात आहे. अंदरम्यान वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचल्यावर या बछड्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याच्यावरर उपचार करुन बछड्याला पुन्हा मादीच्या जवळ सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.