पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. हा ९३.३७ टक्के लागला असून त्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक असून तो ९१.५ टक्के आहे. तर ९१.९५ टक्क्यांसह मुंबई विभाग तळाशी आहे. उत्तीर्ण होण्याच्या संख्येत मुलींच यावेळीही आघाडीवर असून त्यांची टक्केवारी ९५.४४ टक्के आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्केवारी ९१.६० टक्के आहे.
या निकालाची विभागनिहाय आकडेवारी देण्यात आली आहे. त्यात कोकण – ९१.५१ टक्के, पुणे – ९४.४४ टक्के, कोल्हापूर – ९४.२४ टक्के, अमरावती – ९३ टक्के, छत्रपती संभाजीनगर-९४.०८ टक्के, नाशिक- ९४.७१ टक्के, लातूर – ९२.३६टक्के, नागपूर – ९३.१२ टक्के, मुंबई – ९१.९५ टक्के आहे.
यावर्षी राज्यात १४ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्याचा निकाल लागला आहे. हा निकाल दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने पाहता येणार आहे.
या लिंकवर बघा निकाल
mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
http://results.targetpublications.org