गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ऐन लग्न सोहळ्यात नवरदेवावर भावाचा गोळीबार…नेमकं घडलं काय

by India Darpan
मे 21, 2024 | 12:44 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
झाशीःलहानपणाच्या घटनेचा राग मनात धरून ऐन लग्न सोहळ्यात नवरदेवावर गोळ्या झाडण्यात आल्या. मावस भावानेच हा गोळीबार केला असून त्यात नवरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गोळ्या झाडणाऱ्या तरुणाला वऱ्हाडी मंडळींनी पकडले. त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून आरोपीने गोळीबाराचे कारण सांगितले.

झाशीतील कुंडा क्षेत्रातील गढीनेगी गावात राहाणाऱ्या ओम प्रकाश यांचा मुलगा करण कुमार यांचे रामपूर येथे राहणाऱ्या हरदयाल यांच्या मुलीशी लग्न ठरले होते. मुहूर्तावर गढीनेगीहून रामपूरला वरात निघाली. नवरा मुलगा करण कुमार घोड्यावर स्वार झाला. त्यानंतर अचानक करण कुमार याच्या मावशीचा मुलगा अजय कुमार अचानक वरातीत घुसला. त्याने करण कुमारवर दोन गोळ्या झाडल्या. यातली एक गोळी करन कुमारच्या छातीत घुसली. त्यामुळे करण जागेवरच कोसळला.

करणचा मामा चंद्रपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार अजय कुमार लहानपणी करण कुमार यांच्या घरीच राहायचा. त्या वेळी करणने अजयला कोणत्या तरी झालेल्या भांडणात कानाखाली मारली. त्याचा राग अजयच्या मनात ठसठसत होता.या अपमानाचा बदला घ्यायचा हे अजयने मनाशी ठरवले होते. गावठी कट्टा मिळवून ऐन लग्नाच्या दिवशी त्याने करणवर गोळ्या झाडल्या.

लहानपणी झालेले भांडण करण त्याच वेळी विसरून गेला होता. करणने अजयला लग्नाचे निमंत्रण पाठवले होते. हीच वेळ साधत त्याने आपला हेतू साध्य केला. सुदैवाने या हल्ल्यातून करण बचावला. रामपूरच्या सरकारी रुग्णालयात करणवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सप्तशृंगी गडावर जात असताना अचानक घाटात टेम्पो ट्रॅव्हलला आग

Next Post

महिलेच्या गळयातील ५० हजाराची सोनसाखळी दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली

India Darpan

Next Post
crime 118

महिलेच्या गळयातील ५० हजाराची सोनसाखळी दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011