नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सप्तशृंगी गडावर जात असताना अचानक घाटात टेम्पो ट्रॅव्हल ला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणाला जीवितहानी झाली नाही.ही घटना समजताच गडावरील आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी तेथे पोहतच त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. यात मदतीला गडावरील सामाजिक कार्यकर्ते धावून आले. २ चालक, १० महिला, ९ पुरुष असे एकूण २१ प्रवासी सदर वाहनात होते.
टेम्पो ट्रॅव्हलला आग मात्र कशामुळे लागली याचे कारण समोर आले नाही. वायरिंगला शॉर्टसर्किट मुळे आग लागली असल्याचे सांगितले जात आहे.