मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या 5 व्या टप्प्यात आज 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 49 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे.लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या 5 व्या टप्प्यात मुंबईतील सहा जागांसह महाराष्ट्रातील 13 मतदारसंघात आज मतदान झाले.
या मतदानात देशाच्या आर्थिक राजधानीत रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज सकाळी त्यांच्या कुटुंबासह मतदान केले. लोकशाहीच्या उत्सवात शहरातील मतदान केंद्रांवर चित्रपटसृष्टीतील नामवंतानी आपला मतदानाचा हक्क बजावला. जान्हवी कपूर, अनिल कपूर, ईशा देओल, राजकुमार राव, आशा भोसले. दिव्या दत्ता, शाहिद कपूर, नाना पाटेकर, प्रशांत दामले , परेश रावल. हेमा मालिनी, सुभाष घई, गुलजार, रणदीप हुडा, धर्मेंद्र आणि सुनील शेट्टी हे होते.
यंदाच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने मतदानाच्या विविध टप्प्यांमध्ये विशिष्ट संकल्पनेवर आधारित मतदान केंद्रे तयार केलेली पहायला मिळाली. असेच एक आगळेवेगळे डहाणू येथे उभारलेले ‘कोळी मतदान केंद्र’ महाराष्ट्रातील मच्छीमारांचे प्रतिनिधित्व करते.
शहरातील विविध भागांमध्ये ज्येष्ठ नागरिक उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले.निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या मतदान केंद्रावर नेण्या-आणण्यासाठी ऑटो रिक्षा आणि बसेसची विशेष व्यवस्था केली होती.