नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील दिंडोरी मतदार संघातील मेव्हणे येथे मतदान संपण्याची वेळ होऊन देखील ग्रामस्थ मतदार मतदान करण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्याने अखेर मेव्हणे गावातील मतदान केंद्रावर कुठल्याच उमेदवारांच्या नावाने मतदान होऊ शकले नाही.
वर्षानुवर्षे पाणी समस्या, गावातील इतर नागरी सुविधा, अवकाळी नुकसानीचे अनुदान न मिळणे अशा विविध समस्यांमुळे येथील ग्रामस्थ त्रस्त झाले होते. त्यामुळे त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. दुपारी मालेगावचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची भेट घेतली. मात्र त्याचा कुठलाही फायदा झाला नाही. मतदनाची वेळ टळली. पण, एकही ग्रामस्थांनी मतदान केले नाही.