नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माहेरून ७० लाख रूपये आणावेत या मागणीसाठी शहरातील एका विवाहीतेचा पूणे स्थित सासरच्या मंडळीने मानसिक व शारिरीक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. स्त्रीधन काढून घेत महिलेस घराबाहेर काढल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पतीसह अन्य सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणा-या पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. फेब्रुवारी २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान महिलेचा छळ करण्यात आला. माहेरून ७० लाख रूपये आणावेत या मागणीसाठी पतीसह सासरच्या मंडळीने महिलेस शिवीगाळ व मारहाण केली.
या काळात तिचे स्त्रीधन काढून घेण्यात आले. जीवे ठार मारण्याची धमकी देत घराबाहेर काढल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.