इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक रोडचे वैभव आणि सुखसुई नियुक्त असणाऱ्या बिटको कॅालेज जवळील हॉटेल मानसी टूरिस्ट अँड फॉर्च्यून हॉल नूतनीकरण व कोनशिला अनावरण उद्घाटन सोहळा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमात हॅाटेलचे संचालक डॉ.सुरेश मोगल पाटील – मोगल यांनी मान्यवरांचे स्वागत केले. डॅा. पाटील यांच्या अथक परिश्रमातून तयार झालेल्या हॉटेल मानसीचे भव्य दिव्य स्वरूपात उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
वाढत्या लोकसंख्येची नुसार, नाशिक रोड शहरात बदल होत असून या शहराची सुख सुविधांच्या आधारे व मानवी नवनवीन उपक्रम साधनांचा वापर करून तसेच व्यापार करण्यासाठी आलेल्या काही उत्तम अशा संस्था यासाठी राहण्याची अशी सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कार्यक्रमानिमित्ताने राहण्यासाठी उपलब्ध सोय सुख तसेच सुखी राहण्यासाठी वेळेला महत्त्व असते. त्याचाच एक भाग म्हणून राहण्याचे उत्तम सोय आणि प्रशस्त असणारे रूम आता हॅाटेलमध्ये नव्या रुपात असणार आहे. या बदललेल्या हॅाटलेला व हॅाललाच तुम्ही नक्की एकदा भेट द्या…
या कार्यक्रमात आ. सत्यजित तांबे, मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, द्राक्ष बागातदार संघाचे माजी अध्यक्ष देवराम पाटील मोगल, ब्रह्मा व्हॅली शैक्षणिक संस्था अध्यक्ष राजारामजी पानगव्हाणे, याप्रसंगी सौ. छाया सुरेश पाटील. दंतरोगतज्ञ डॉ. मयुरा पाटील, डॉ.प्रियंका सनील शिंदे पाटील, स्त्रीरोगतज्ञ मानसी पाटील, तसेच माजी सभापती एम व्ही पी. डॉ. सुनील ढिकले, डॉ.सनील शिंदे, सदाशिव शिंदे. संपत देशमुख. अशोक पाटील. डॉ. सुभाष देवरे, सुरेश पाटील. डॉ.राजेंद्र बोरस्ते. सदाशिव दुर्जड सीए विलास धुर्जड. प्राचार्य संपत काळे, देवळाली कॅम्प. डॉ. उदावंत .डॉ. चांदवाणी. डॉ. कोरकने. डॉ. नगरकर डॉ.प्रमोद आहेर. सुरेश दिंडे, माजी.पोलीस अधिकारी रायते साहेब, युवा नेते विक्रम गांगुर्डे, अॅड. संदीप दळवी, संजय भुतडा आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते.
याप्रसंगी नामवंत डॉक्टरांनी शुभेच्छा पर भेट देऊन हॅाटेल व हॅालच्या बदलल्या रुपाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस माजी महसूलमंत्री. बाळासाहेब थोरात यांचा व मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन तसेच स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. हॉटेल मानसी टुरिस्ट अँड फॉर्च्यूनचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले .त्याचबरोबर कोनशीला अनावरण करण्यात आले. मान्यवरांनी संपूर्ण हॉटेलची पाहणी करून येथील सुख समृद्धी आणि सोयींची व्यवस्था केल्याची दिसून आल्याचे आनंद व्यक्त करुन डॉ. सुरेश पाटील मोगल यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.पेखळे मॅडम यांनी केले. तर आभार डॉ. मानसी पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून समाधान व्यक्त केले.