मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परिक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर केला जाणार आहे. हा निकाल विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने पाहू शकणार आहेत. दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता निकाल जाहीर केला जाईल. राज्यामध्ये २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ यादरम्यान बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता हा निकाल घोषित केला जाणार आहे.
राज्यामध्ये तब्बल १४ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. बारावीचा निकाल ९ विभागांमध्ये लागणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा एकूण नऊ विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
या साईटवर जाऊन विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात.
1) mahresult.nic.in
2) mahahsscboard.in
3) hsc.mahresults.org.in
4) hscresult.mkcl.org
5) results.gov.in.