नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक लोकसभा मतदार संघात उत्साहात सकाळी मतदानाला सुरवात झाली. सकाळी नऊ पर्यंत दिंडोरीत ६.४५ टक्के मतदान झाले. तर ११ पर्यंत १६.३ टक्के मतदान झाले. तर १ वाजेपर्यंत २८.५१ टक्के मतदान झाले. ३ वाजेपर्यंत ३९.४१ टक्के तर पाच वाजपर्यंत ५१.१६ टक्के झाले. त्यानंतर सरासरी मतदानाचा आकडा समोर आला असून तो ६१ टक्के आहे. लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ आहे. विधानसभा निहाय आकडेवारी सुध्दा समोर आली असून त्यात सिन्नर ६८, नाशिक पूर्व ५६, नाशिक मध्य ५७, नाशिक पश्चिम ६०, देवळाली ६१ इगतपुरी ६६ असे मतदान झाले आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघात २० लाख, ३० हजार, १२४ मतदारत्यातील ६१ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.