नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथील काही युवा तरुणांनी कांद्याला भाव नसल्याने निषेध म्हणून कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला गेले. पण, गेटवरवरच पोलिसांनी त्यांना अडवत गळ्यातील कांद्याच्या माळा काढण्यास सांगितले. त्यानंतर या शेतक-यांचा पोलिसांबरोबर वाद झाला. त्यानंतर अखेर गळ्यातील माळा काढून ठेवत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला…