मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव तालुक्यातील मेव्हणे गावातील, पाणी समस्या, गावाचा विकास, दुष्काळी परिस्थिती तसेच अवकाळीचे अनुदान अशा विविध समस्या असताना काही दिवसांपूर्वी मेव्हणे गावाने मतदानाचा इशारा दिला होता. प्रशासनाकडे दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचे टँकर वाढून मिळावे तसेच आमच्या समस्या सोडवाव्यात असे निवेदन दिले. मात्र त्याची कोणतीही दखल प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी यांनी घेतली नाही. त्यामुळे या गावाने मतदानावर बहिष्कार घातला…