नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदार संघात उत्साहात सकाळी मतदानाला सुरवात झाली. सकाळी नऊ पर्यंत दिंडोरीत ६.४० टक्के मतदान झाले. तर ११ पर्यंत १९.५ टक्के , एक पर्यंत ३३.२५ टक्के ३ वाजेपर्यंत ४५.९५ टक्के मतदान झाले. तर पाच वाजेपर्यंत ५७.०६ टक्के मतदान झाले. त्यानंतर अंदाजीत एकुण आकडेवारी आली आहे. त्यात ६२.६६ टक्के मतदान झाले आहे. सहा विधानसभा मतदार संघ आहे. विधानसभा निहाय आकडेवारी सुध्दा समोर आली असून त्यात नांदगाव ५५.१, कळवण ६३.४५, चांदवड ६६.०२, येवला ६३.२ , निफाड ६२.७६, दिंडोरी ६६ टक्के मतदान झाले आहे.
दिंडोरी लोकसभा मतदार संघात १८ लाख, ५३ हजार मतदार आहे. त्यातील ६२.६६ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. तालुकानिहाय आकडेवारी बघा….