इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नशिक -नाशिक जिल्ह्यात ४ जण पाण्यात बुडाले असून त्यात दोन जणांचा मृत्यू झाला तर दोन जणांचा शोध सुरु आहे. शहरातील गोदावरी नदीत दोन आणि इगतपुरीतील वालदेवी धरणात दोन गणेशभक्त बुडाले. त्यात इगपुरीत बुडाल्याचे दोघांचे मृतदेह मिळाले आहे.
नाशिक शहरातील गोदावरी नदीवरील घटना सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या ठिकाणी रामकुंड परिसरातील गाडगे महाराज पुलाजवळील घाटावर दोन गणेश भक्त बुडाले. हे गणेश भक्त विसर्जनासाठी आले होते. याचवेळी ते दोघेही बुडाल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत या दोघांचाही बचाव पथकाकडून शोध घेतला जात आहे.
तर दुसरी घटना इगतपुरी तालुक्यातील वालदेवी धरणात परिसरात घडली आहे. वालदेवी परिसरात मित्रांसोबत गेलेल्या दोन युवकांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दोघांचेही मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले असून पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. काल निफाड तालुक्यात एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.