पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे शहरातील कल्याणीनगर विमाननगर परिसरात काल रात्री एका भरधाव वेगात धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाल्या प्रकरणात आरोपी असलेल्या वेदांत अग्रवाल याला अटी शर्तीवर न्यायालयाने जामीन मंजूर केला. ज्या अटीवर त्याला जामीन दिला आहे. त्या अटींमध्ये १५ दिवस ट्रॅफिक कॅान्सटेबलतसोबत वाहतूक नियंत्रण करावे लागणार आहे.
वेदांत हा प्रसिध्द बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. त्याने काल मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने गाडी चालवत ही धडक दिल्यामुळे हा अपघात झाला होता. या प्रकरणी येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात अपघात करणा-या अल्पवयीन आरोपी असलेल्या वेदातंला ताब्यात घेण्यात आले.त्यानंतर त्याला आज न्यायलायात उभे केले असता त्याला अटी व शर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला.
अशी घडली घटना
या अपघातात आश्विनी व अनिस हे दोघेही मोटारसायकल वरुन कल्याणीनगरकडून येरवड्याकडे मित्रांसह जात होते. त्यावेळी पोर्से या अलिशान कार चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर या गाडीने मोटारसायकल आणि इतर वाहनांना धडक दिली. यात अश्विनी कोस्ताचा जागीच मृत्यू झाला तर अनिल अवलियाचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला.डीसीपी विजयकुमार मगर यांनी सांगितले की, पोर्श कारने मागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. एफआयआर नोंदवण्यात आला. त्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला.