नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरलेल्या दोघा भामट्यानी लॅपटॉपसह मोबाईल हातोहात लांबविल्याची घटना कॉलेजरोड भागातील एका मॉलमध्ये घडली. या घटनेत ५० हजाराचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वामी रविंद्र ब्राम्हणे (रा.चोपडा लॉन्सजवळ,जुना गंगापूरनाका) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ब्राम्हणे कॉलेजरोड भागातील श्रध्दा मॉलचे काम बघतात. तळमजल्यावरील इलेक्ट्रीक वस्तूंच्या काऊंंटरवर ते शुक्रवारी (दि.१७) सेवा बजावत असतांना ही घटना घडली.
खरेदीसाठी आलेल्या २० ते २५ वयोगटातील दोघांनी ही चोरी केली. ब्राम्हणे व त्यांच्या सहकाºयास बोलण्यात गुंतवून भामट्यांनी लॅपटॉपसह मोबाईल असा सुमारे ५५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार पगार करीत आहेत.