मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी २० मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजे दरम्यान मतदान होणार आहे. या मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई असणार आहे. याबाबतचे स्पष्ट निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या प्रत्येक निर्देशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन दक्ष आहे.
मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करणे, मतदान केंद्रांवरील शांतता भंग करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाईलचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाईल घेऊन जाण्यास मतदारांना मज्जाव करण्यात आला आहे. मतदारांना मतदान केंद्रापासून १०० मीटर बाहेर मोबाईल ठेऊन मतदान करण्यासाठी जावे लागणार आहे.