इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची संयुक्त सभा होती. या सभेमध्ये झालेल्या प्रचंड गर्दीमुळे त्यांना भाषण न करताच काढता पाय घ्यावा लागला. ही सभा प्रयागराजमध्ये होती. या सभेत राहुल गांधी व अखिलेश यादव हे व्यासपीठावर पोहचताच समर्थकांनी बॅरिकेटस तोडत व्यासपीठाकडे धाव घेतल्यामुळे काहीवेळ गोंधळ निर्माण झाला. त्यांनी अगोदर शांततेचे आवाहन केले. पण, कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरुच असल्यामुळे ते भाषण न करता निघून गेले.