इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गडचिरोली येथे एकाच कुटुंबातील दोन २ महिलांनी तब्बल १६ जणांचा जीव घेतल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणात विषबाधेतून सर्वांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे. गडचिरोली जिल्ह्यात घडलेल्या ५ जणांच्या हत्याकांडामुळे राज्यात तसेच देशभरात चर्चा आहे. २ महिलांनी मिळून २० दिवसांत कुटुंबातील ५ सदस्यांची हत्या केली. या हत्या हळूहळू कुणालाही संशय येऊ नये अशा केल्या. अखेर पोलिसांनी २ महिलेला अटक केली. कुटुंबातील सदस्यांच्या जेवणात विषारी द्रव टाकून हत्या करण्यात आली. या महिलांनी जेवणात आणि पाण्यात हे मिसळले होते.
एका आरोपीला तिचा पती आणि सासरच्यांकडून सतत टोमणे मारले जात होते म्हणून तिने क्रूर कृत्य केले तर दुसऱ्या महिलेला वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद झाला होता म्हणून या दोन्ही महिला आरोपींनी १६ जणांना मारण्याचं प्लॅनिंग आखल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात झाला आहे. २६ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत ही घटना घडली. एका पाठोपाठ एका कुटुंबातील ५ लोकांची हत्या झाल्याने सगळेच हैराण झाले होते. हे सर्व मृत्यू नैसर्गिक वाटत होते. मृत लोकांच्या शरीरात वेदना, पाठीच्या खालील बाजून आणि डोके प्रचंड दुखू लागले, त्यामुळे उपचारावेळी यांचा मृत्यू झाला. २० सप्टेंबरला महागावातील शंकर कुंभारे आणि पत्नी विजया कुंभारे आजारी पडले. २६ सप्टेंबर आणि २७ सप्टेंबरला त्या दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांनी शंकर यांचा मुलगा रोशन, मुलगी कोमल, आनंद यांनाही हीच लक्षणे जाणवली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या तिघांनी ८ ते १५ ऑक्टोबर काळात जीव सोडला.
तपासासाठी पाच टीम
कुटुंबाची अडचण आणखी वाढली जेव्हा शंकर यांचा दुसरा मुलगा सागर हा आई वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी दिल्लीहून आला होता. घरी परतल्यानंतर तोदेखील आजारी पडला. शंकर आणि विजया यांना चंद्रपूरला घेऊन जाणारा चालकही आजारी पडला. कुटुंबाच्या मदतीला आलेला एक नातेवाईकही अशाच लक्षणांनी आजारी पडला. त्याला हॉस्पिटलला दाखल करावे लागेल. जेव्हा डॉक्टरांना विषबाधेचा संशय आला मात्र प्राथमिक तपासात याची पुष्टी झाली नाही. पोलिसांनी सध्या या प्रकरणाच्या तपासासाठी ५ टीम तयार केल्या आहेत.