निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेत कुठलीही जिवित हानी झाली नाही. पण, कार संपूर्णपणे जळून खाक झाली.
गेल्या काही दिवसात वाहनांना आग लागल्याच्या घटना वारंवार घडत आहे. या घटनेत निफाड तालुक्यातील पिंपळस ते गोंडेगाव फाट्या दरम्यान असणा-या बानगंगा पुलावर कारने अचानक पेट घेतला. पण, त्यामागचे कारण समजले नाही.
अंदरसूल येथील चालक आकाश राजेंद्र राऊत हा कार चालवत होता. त्याला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर तो कारमधून उतरल्यामुळे बचावला.