येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अगंभूत अभिनयाचा गुण भुजबळांमध्ये असल्यामुळे ते कधी कधी एखाद्या प्रश्नांवर मिश्किल प्रतिक्रिया देत असतात. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ते येवल्यात आज आले असता पत्रकारांनी त्यांना अबकी बार मोदी सरकार आपको कोई शक असा प्रश्न विचारला. त्यावर भुजबळांनी मुझे तो कोई शक नही, मोदी की सरकार आने वाली है… असे सांगत अब की बार मोदी सरकार असे सांगितले.
यावेळी त्यांनी मतदानाची टक्केवारी कमी होत असल्याने जास्तीजास्त नागरिकांनी मतदान करावे, उन्हाची तीव्रता जास्त असल्याने सकाळी लवकर बाहेर पडून मतदान करावे किंवा मतदान संपण्या अगोदर मतदान करावे मत कोणालाही द्या मात्र मतदान जरूर करा असे आवाहन भुजबळ यांनी केले.
यावेळी त्यांनी उमेदवारीला का नकरा दिला यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले मला कुठल्याच गोष्टी अपेक्षा नाही जे पक्ष सांगेल ती भूमिका, मला मुख्यमंत्री, मंत्री ,खासदारकी याची कुठलीच अपेक्षा नसल्याचे सांगत खासदारकीच्या उमेदवारी साठी ती पक्षात चढाओढ होत असल्याने मी स्वतः नकार दिल्याचेही त्यांनी सांगितले.