इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विश्वचषकमध्ये सलग चार सामने जिंकल्यानंतर भारताचा पाचवा सामना न्यूझीलंड विरुध्द सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने टॅास जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे न्यूझीलंडाल भारत किती धावात रोखतो हे महत्त्वाचे आहे. क्रिकेट विश्लेषकाच्या मते २८० धावा न्यूझीलंड संघ करेल असे सांगितले जात आहे. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतासारखेच न्यूझीलंडने सुद्दा सलग चार सामने जिंकले आहे. पण, गुणतालिकेत हा संघ अव्वल आहे. त्यामुळे या सामन्यात भारताने विजय मिळवला तर भारतीय संघ अवल्लस्थानी असणार आहे.
धरमशाला येथे हा सामना दुपारी २ वाजता हा सामना सुरु झाला आहे. भारताची टीममध्ये रोहित शर्मा (कॅप्टन), सुर्यकुमार यादव, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी या खेळाडूंना संधी मिळाली आहे. हार्दिक पांडया जखमी असल्यामुळे तो खेळणार नाही. तर शार्दूल ठाकूर बदल्यात मोहम्मद शमी याला संधी देण्यात आली आहे.
पावासाचे सावट
या सामन्यावर पावसाचे सावट असल्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये न्यूझीलंड भारत सामन्यातही अशीच पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे साखळीतील हा सामना रद्द झाला होता. त्यानंतर हा सामना राखीव दिवशी झाला व भारतीय संघ १८ धावांनी पराभूत झाला होता. आज धरमशाला येथे होणा-या या सामन्यापूर्वी शनिवारी सराव करतांना इशान किशन याला मधमाशीने दंश केल्यामुळे तर सूर्यकुमार यादव सराव करताना त्याच्या उजव्या हाताला चेंडू लागल्यामुळे त्यांनी सराव केला नाही. पण, यातील सुर्यकुमार आज मैदानात उतरला आहे.
याअगोदर बांगलादेशच्या सामन्यात हार्दिक पंडया हा जखमी झाला होता. त्यामुळे भारतीय संघाला तो धक्का लागला आहे. भारतीय संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. त्यामुळे रोहित शर्मा व्यूहरचना कितपत यशस्वी होते हे महत्वाचे आहे.