इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बेंगळुरूः कर्नाटकातील हसन मतदारसंघाचे खासदार आणि भाजच्या मित्रपक्षाचे निलंबित उमेदवार प्रज्वल रेवण्णा याच्याविरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. कर्नाटकच्या ‘एसआयटी’ने प्रज्वल विरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याची परवानगी मागितली होती.
लोकसभा निव़णुकीच्या रणधुमाळीतच गेल्या महिन्यात प्रज्वल याच्यावर लैंगिक छळ, शेकडो व्हिडिओ रेकॉर्डिंग, धमकावणे आणि कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता. रेवण्णाशी संबंधित अनेक व्हायरल व्हिडिओ २६ एप्रिल रोजी हसनमध्ये शेअर करण्यात आले होते. या पेन ड्राईव्हमध्ये २९०० हून अधिक व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला होता. हे व्हिडिओ प्रज्वल यांनी रेकॉर्ड केले होते. यानंतर ते ‘सोशल मीडिया’वर शेअरही झाले.
राज्य महिला आयोगाच्या प्रमुख नागलक्ष्मी चौधरी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीजीपी यांना पत्र लिहिल्यानंतर कर्नाटक सरकारने या प्रकरणाची दखल घेतली. महिला आयोगाने मुख्यमंत्री आणि पोलिसांना लिहिलेल्या पत्रात व्हिडिओ रेकॉर्ड आणि वितरित करणाऱ्यांवर तपास आणि कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर कर्नाटक सरकारने २७ एप्रिल रोजी ‘एसआयटी’ स्थापन करून तपासाचे आदेश दिले होते.