इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आयपीएल २०२४ स्पर्धेत सलग सहा सामने गमावणाऱ्या आरसीबीने चेन्नई सुपर किंग्सचा २७ धावांनी पराभव करत विजय मिळवला. आरसीबी आणि चेन्नई या दोन्ही संघांचा हा या हंगामातील अखेरचा आणि करो या मरो असा सामना होता. चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी हा सामना केवळ जिंकायचा होता. मात्र आरसीबीला प्लेऑफच्या तिकीटासाठी हा सामना १८ धावांच्या फरकाने जिंकायचा होता. पण, तो २७ धावाने जिंकला.
या विजयानंतर आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरली. आरसीबीच्या या विजयासह विराट कोहली हा भावूक झालेला दिसून आला. तर दुसऱ्या बाजूला विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मालाचही प्रचंड आनंद झाला. विराटने या विजयानंतर मैदानात आनंदाने उड्या मारल्या. कॅप्टन फाफ डु प्लेसीस आणि अन्य सहकाऱ्यांना कडाडून मीठी मारली.
या सामन्यात आरसीबीने चेन्नईसमोर २१९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. चेन्नईने या धावांचा पाठलाग करत आशा कायम ठेवल्या होत्या. आरसीबीला नेट रनरेटनुसार क्वालिफाय करण्यासाठी शेवटच्या ३ ओव्हरमध्ये विजयासाठी ५० आणि अखेरच्या षटकात १७ धावांचा बचाव करायचा होता. तर चेन्नईकडून रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी ही घातक जोडी मैदानात होती.
कॅप्टन फाफ डु प्लेसीस याने यश दयाल याला अखेरची ओव्हर दिली. महेंद्रसिंह धोनीने यश दयालच्या पहिल्याच बॉलवर सिक्स ठोकला. पण, दुसऱ्याच बॉलवर धोनीला कॅच आऊट झाला व आरसीबीचा विजयी झाला. यशने पुढील ४ बॉलमध्ये फक्त १ धाव दिली. यशने यशस्वीपणे अखेरच्या ओव्हरमध्ये १७ धावांचा बचाव करताना फक्त ७ धावा दिल्या. आरसीबीने यासह इतिहास रचला आणि प्लेऑफचं तिकीट १४ गुणांसह मात्र नेट रनरेटच्या जोरावर मिळवले.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे कॅप्टन फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक , कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन आणि मोहम्मद सिराज यांनी चांगली कामगिरी केली.