मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यूट्युब पाहून एरा तरुणाने नोटा बनवल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. एका नववी पास तरुणाने यूट्यूबवर नोटा छापण्यासंदर्भातील व्हिडिओ पाहून थेट बनावट नोटा छापण्याचा कारखाना काढल्याचे उघड झाले आहे. लाखो रुपयांच्या नोटा या तरुणाने चलनात आणल्या आहे. प्रफुल्ल पाटील असे त्याचे असून नवी मुंबई पोलिसांनी त्याला तळोजा परिसरातून अटक केली.
तळोजा परिसरात प्रफुल्ल पाटील (वय२६) हा तरुण राहतो. त्याचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. तो बनावट नोटा छापत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. प्रफुल्लने यूट्यूबवर व्हिडिओ पाहून या नोटांची छपाई केली. संगणक व प्रिंटरचा वापर करत त्याने नोटा छापल्या. बनावट नोटांचा छापखाना पाहून पोलिस हादरले.
पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर मध्यरात्री धाड टाकली. त्याला ताब्यात घेऊन झाडाझडती केली असता त्याच्याजवळ आणि घरात दोन लाखांच्या बनावट नोटा आढळल्या.