शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर…एफएसएसएआयने दिले कठोर कारवाई दिले आदेश

मे 19, 2024 | 12:03 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled 71

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) फळांचे व्यापारी, फळे हाताळणारे, अन्नपदार्थांचे व्यवसायिक (FBOs) तसेच फळे पिकविणाऱ्या केंद्रांचे चालक यांना, विशेषत: आंब्याच्या हंगामात, फळे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावरील प्रतिबंधाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत. एफएसएसएआय’ने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा विभागांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे, तसेच अन्नसुरक्षा आणि मानके कायदा, 2006 आणि त्यानुसार बनवलेल्या नियम आणि विनियमांच्या तरतुदींनुसार अशा बेकायदेशीर पद्धतींमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीविरुद्ध (व्यक्तींविरुद्ध) कठोर कारवाई करावी, असे सुचवले आहे.

सामान्यतः आंब्यासारखी फळे पिकवण्यासाठी वापरले जाणारे कॅल्शियम कार्बाइड वातावरणात ॲसिटिलीन वायू सोडते. ॲसिटिलीनमध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरसचे हानिकारक अंश असतात. ‘मसाला’ म्हणूनही ओळखले जाणाऱ्या या पदार्थांमुळे चक्कर येणे, वारंवार तहान लागणे, चिडचिड, अशक्तपणा, गिळायला त्रास होणे, उलट्या होणे आणि त्वचेवर फोड येणे इत्यादी गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. शिवाय, ऍसिटिलीन वायू, तो हाताळणाऱ्यांसाठी देखील तितकाच घातक आहे. कॅल्शियम कार्बाइड वापरताना ते फळांच्या थेट संपर्कात येण्याची तसेच आर्सेनिक आणि फॉस्फरसचे अंश फळांवर शिल्लक राहण्याची शक्यता असते.

या धोक्यांमुळे, फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर अन्न सुरक्षा आणि मानके (विक्रीवर प्रतिबंध आणि निर्बंध) विनियम, 2011 च्या नियमन 2.3.5 अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे.

बंदी घातलेल्या कॅल्शियम कार्बाइडच्या सर्रास वापराचा मुद्दा लक्षात घेऊन, एफएसएसएआय’ने भारतात फळे पिकण्यासाठी सुरक्षित पर्याय म्हणून इथिलीन वायूचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. इथिलीन वायूचा वापर पीक, विविधता आणि परिपक्वता यावर अवलंबून असून 100 पीपीएम (100 μl/L) पर्यंत त्याचा वापर केला जाऊ शकतो.

याशिवाय, केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समिती (CIB आणि RC) ने आंबा आणि इतर फळे एकसमान पिकवण्यासाठी इथेफॉन 39% SL ला मान्यता दिली आहे.

एफएसएसएआय’ने “फळे कृत्रिमरित्या पिकवण्याची पद्धत – इथिलीन वायु, फळे पिकवण्याचा एक सुरक्षित पर्याय” (https://www.fssai.gov.in/upload/uploadfiles/files/Guidance_Note_Ver2_Artificial_Ripening_Fruits_03_01_2019_Revised_10_02_2020.pdf) ही मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित केली आहे. या पुस्तिकेतील प्रक्रियेचे अनुसरण करून फळे कृत्रिमरीत्या पिकवावीत, अशी सूचना दिली आहे.

कॅल्शियम कार्बाइडचा वापर किंवा फळे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी पिकवणारे घटक वापरण्याची कोणतीही चुकीची प्रथा ग्राहकांच्या निदर्शनास आल्यास, अशा उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी संबंधित राज्य अन्न सुरक्षा आयुक्तांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांचे तपशील खालील लिंकवर उपलब्ध आहेत: https://www.fssai.gov.in/cms/commissioners-of-food-safety.php.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १८ मार्चचे राशिभविष्य

Next Post

अवकाळी पाऊस, मान्सून व वातावरण यावर बघा हवामानतज्ञांचा अंदाज

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
Untitled 28

अवकाळी पाऊस, मान्सून व वातावरण यावर बघा हवामानतज्ञांचा अंदाज

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011