नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात १८ मे रोजी (सायंकाळी सहा वाजेपासून) ते २० मे रोजी मतदान संपेपर्यंत तसेच मतमोजणीच्या दिवशी ड्राय डे (कोरडा दिवस) जाहीर करण्यात आला आहे. मतदारसंघातील सर्व अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.