इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीमध्ये आप व भाजपमधील संघर्ष वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून आपच्या एक एक नेत्यांना अटक होत असल्यामुळे केजरीवाल यांचा संताप ववाढला आहे. त्यामुळे त्यांनी आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे.
आज सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत केजरीवाल यांनी सांगितले की, मला पंतप्रधानांना सांगायचे आहे – तुम्ही ‘जेल गेम’ खेळत आहात.
उद्या मी माझ्या सर्व प्रमुख नेते, आमदार, खासदारांसह दुपारी १२ वाजता भाजप मुख्यालयात येत आहे.ज्याला पाहिजे त्याला तुरुंगात टाकू शकता.
लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधूमाळीत हा संघर्षात पुढे काय काय होते हे महत्त्वाचे आहे.