इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत खा. संजय राऊत यांनी मोदी यांच्यावर केलेली एकेरी टीका त्यांच्या अंगलट आली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांच्यावर नगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत मुगल बादशहा औरंगजेब यांच्या जन्मस्थानाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खा. संजय राऊत यांनी एकेरी टीका केली होती. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगजेब व पंतप्रधान मोदी यांचा जन्म एकाच गावात झाला. आम्ही औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडले, तर तू कोण? असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानावरून नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमादार अतुल काजळे यांनी शुक्रवारी फिर्याद दाखल केली. निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी खा. राऊत यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव कोतवाली पोलिसांकडे पाठवला होता. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.