शनिवार, नोव्हेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या…जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे आवाहन

मे 18, 2024 | 4:11 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240508 WA0373 2

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी व नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार, २० मे रोजी मतदान होत असून मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी धावपळ टाळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मा. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी मतदारांना मतदार यादीतील नावाच्या सुलभ माहितीसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांचा मदतीने आधीच मतदान केंद्राची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

पत्रकात म्हटले आहे, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत आहे किंवा कसे याबाबतच्या माहितीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी / मतदार नोंदणी अधिकारी यांचे नियंत्रण कक्ष तसेच मतदान मदत केंद्र क्रमांक 1950 येथे संपर्काची सुविधा मुख्य निवडणूक अधिकारी यांनी उपलब्ध करून दिली आहे.

संपर्क क्रमांक १९५० येथे संपर्क केल्यानंतर मतदाराने त्यांचे पूर्वीच्या निवडणुकांमध्ये ज्या ठिकाणी मतदान केले होते किंवा सध्याच्या निवासाचा पत्ता इत्यादी तपशील सांगितल्यास सदर केंद्रावरील कर्मचारी मतदाराचे नाव शोधून देण्यासाठी अधिकची माहिती देवून सहकार्य करू शकतील.

याशिवाय भारत निवडणूक आयोगाचे मतदार पोर्टल https://voters.eci.gov.in/. वर मतदाराने प्रथम राज्याचे नाव, स्वत:चे पहिले नाव, वय किंवा जन्मतारीख व लिंग ही अनिवार्य माहिती नमूद केल्यानंतर मतदान त्याचे नाव मतदार यादीत शोधू शकतात. तसेच मतदार ओळखपत्राच्या दहा अंकी क्रमांकाच्या आधारे किंवा मतदाराच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे (सदर मोबाईल संबंधित मतदार माहितीसाठी यापूर्वी जोडलेला असेल तर) आपले नाव , मतदान केंद्र व क्रमांक शोधण्याचा पर्याय लिंकवर उपलब्ध आहे.

Voter Helpline App (VHA) हे ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून त्यामध्ये search your Name in Electoral Roll या पर्यायावर क्लिक करून त्यावर उपलब्ध होणाऱ्या चार उपपर्यायाच्या आधारे आपले नाव व मतदान केंद्र याबाबतचा तपशील मतदार शोधू शकतात. या ॲपमध्ये मतदाराला आवश्यक तपशील नमूद करून किंवा आधीच जोडलेला मोबाईल क्रमांक नमूद करून किंवा मतदान ओळखपत्राचा 10 अंकी क्रमांक नमूद करून त्याआधारे आपले नाव, मतदान केंद्र आणि अन्य तपशिल उपलब्ध होवू शकते. त्याचप्रमाणे नवीन मतदाराच्या ओळखपत्रावर असलेला QR Code स्कॅन करून मतदाराचा तपशील उपलब्ध करता येतो.

ज्या मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत शोधण्यासाठी अडचण येत असतील त्यांनी वरीलपैकी कोणत्याही पर्यायाचा वापर करावा व मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करुन लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन श्री. शर्मा यांनी पत्रकात केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इगतपुरीजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्याखालून धूर…घाबरलेल्या प्रवाशांना उडया मारल्या (बघा व्हिडिओ)

Next Post

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत खा. राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल…हे आहे कारण

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत खा. राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल…हे आहे कारण

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011