इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इगतपुरीः इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या बोगीच्या खाली असलेले लायनर ओव्हर हीट होऊन घासल्याने धूर निघाल्यामुळे काही प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्याची घटना घडली. गाडी स्लो झाल्यानंतर या उड्या मारल्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. हा धूर निघाल्याचे लक्षात येताच गार्ड आणि चालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवली. त्यानंतर त्यांनी एक्स्प्रेस तपासली. त्यानंतर गाडी इगतपुरी स्थानकात आली. तिथे गाडीची बोगी लायनर दुरुस्त करून मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली.
ट्रेनचे रिझर्व्हेशन कोच नंबर एस् ०७ चे ब्रेक लॉकर-कॅलीपर धावत्या स्थितीत चाकांना लॉक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. घर्षण होऊन चाकांना आग लागल्याचे सांगण्यात आले. एक्सप्रेस थांबवून फायर एक्सटुबीशनच्या मदतीने ट्रेनचे ॲसिस्टंट लोको पायलट आणि एसी ॲटेंडट यांच्या मदतीने आग शमवण्यात आली. रेल्वेत दुर्घटना झाली की प्रवाशांना भीती वाटते. त्यामुळे काही प्रवाशांनी उड्या मारल्या.