नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक लोकसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी आज भव्य रॅली काढत नाशिककरांचे लक्ष वेधले. सकाळी आठ वाजेपासून सुरु झालेली ही रॅली शहरातील प्रमुख रस्त्यावरुन गेली. या मतदार संघामध्ये दोन्ही शिवसेना गटाचे उमेदवार यांच्यापुढे शांतीगिरी महाराजांनी आव्हान उभे केले आहे. त्यांनी लढायचे व जिंकायचे असा नारा दिल्यामुळे राजकीय गणित या मतदार संघात बिघडले आहे.
बघा शांतीगिरी महाराज यांची भव्य रॅली लाईव्ह…..