शुक्रवार, नोव्हेंबर 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मुंबईच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर राज ठाकरे यांनी ठेवल्या या मागण्या…

मे 17, 2024 | 11:02 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
GNythO0bMAAJFD8 e1715967103113

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई येथे शुक्रवारी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर आयोजित प्रचारसभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही मुद्दे मांडत लक्ष वेधले.

यावेळी ते म्हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी हे बरोबर २१ वर्षांनी शिवतीर्थावर आले आहेत. त्यावेळेस आपण कमळातून बाहेर आला होतात आणि २०१४ ला आपण कमळाला बाहेर काढलंत. २०१४-२०१९ च्या मोदीजींच्या कार्यकाळाबद्दल मला जे बोलायचं होतं ते मी २०१९ ला बोललो. आता २०१९ ते आत्तापर्यँतचा लेखाजोखा मांडूया.

इतर वक्त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका करून वेळ वाया घालवला. माझ्या मते त्यांच्याबद्दल बोलून काही उपयोग नाही. कारण ते सत्तेत येणार नाही. पण २०१९ ते २०२४ काळात मोदीजींनी जी कामं केली त्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो. राम मंदिर उभारणीच्या आमच्या आशा मावळल्या होत्या पण मोदीजी तुम्ही होतात म्हणून अयोध्येत राममंदिर उभं राहिलं आणि त्या आंदोलनात बलिदान देणाऱ्या कारसेवकांच्या आत्म्याला शांती लाभली. अनेक वर्ष प्रलंबित कश्मीरला विशेष दर्जा देणार ३७० कलम तुमच्यामुळेच हटवलं गेलं. त्यामुळे कश्मीर हे भारतातील इतर राज्यांप्रमाणे आपलंच आहे, हे त्यानंतर वाटू लागलं.

शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पोटगीच्या बाजूने न्याय दिला होता, पण राजीव गांधींनी कायदा संमत करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. पण मोदीजींनी याच पीडित मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाकमधून बाहेर काढलं, त्यांच्यावर जो अन्याय होतोय तो अन्याय कायमचा दूर झाला. त्याबद्दल तुमचं अभिनंदन.

आता २०२४ नंतर जेव्हा मोदीजी आपण पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान व्हाल त्यानंतर माझ्या महाराष्ट्राच्या काही अपेक्षा आपण पूर्ण कराल अशी आशा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही जुनी मागणी आहे ती मागणी पूर्ण व्हावी. जवळपास १२५ वर्ष या हिंदभूमीवर मराठा साम्राज्य होतं त्याचा इतिहास देशातल्या प्रत्येक शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा. शिवछत्रपतींची स्मारकं म्हणजे त्यांनी उभारलेले गडकिल्ले. या किल्ल्यांचं जतन करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष समिती नेमून लक्ष द्यावं. देशात तुम्ही जसे उत्तम रस्ते बनवलेत, पण गेली २० वर्ष रखडलेला आमचा मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करून घ्यावा. तुम्ही तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास संविधान बदलणार अशी आवई विरोधकांनी उठवली आहे, त्यांना तुम्ही उत्तर दिलंच आहे. तुम्ही संविधान बदलणार नाही हे मला माहीत आहेच पण तुमच्याकडून पुन्हा एकदा देशाला आश्वस्त करा की भारतीय संविधानाला धक्का लागणार नाही.

आज देशात अनेक चांगले-देशभक्त मुसलमान आहेत, जे देशाच्या प्रगतीत सहभागी होऊ इच्छितात त्यांना आश्वस्त करा, पण मोहल्ल्यांमध्ये राहणारे, ओवेसीसारख्यांच्या मागे फिरणारा जो मुसलमान आहे त्यांच्या मोहल्ल्यांमध्ये आपले पोलीस घुसवून तिथे ज्या देशविघातक कारवाया सुरु आहेत त्यावर कायमचा चाप बसवा. आणि शेवटची मागणी म्हणजे मुंबई रेल्वेच्या विकासाकडे लक्ष द्या, रेल्वेच्या फेऱ्या वाढवा, प्रवाशांना उत्तम सुविधा मिळावी म्हणून मुंबई रेल्वेला भरपूर निधी द्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये उपनगर कक्षाअंतर्गत असलेल्या या भागातही टप्याटप्याने वीज पुरवठा बंद राहणार

Next Post

नाशिकला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या सभेत भुजबळ म्हणाले मी नाराज नाही…मोदींचे हाथ बळकट करा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
IMG 20240517 WA0459

नाशिकला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या सभेत भुजबळ म्हणाले मी नाराज नाही...मोदींचे हाथ बळकट करा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011