पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या ‘एअर इंडिया’च्या विमानाला ‘पुश बॅक टग’ वाहनाची धडक बसल्याने मोठे भगदाड पडल्याने उड्डाण रद्द करण्यात आले. या अपघातात विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विमान ओढणे किंवा ढकलण्याचे वाहन असणारे पुश बँक टग धडकल्यामुळे ही घटना घडली. या विमानाने सुमारे १६० प्रवासी दिल्लीला निघाले होते. त्यांची गैरसोय झाली.
विमान टॅक्सी ट्रॅकवरून धावपट्टीच्या दिशेने जाण्याआधीच हा अपघात झाला. वैमानिकांनी तत्काळ विमानाची पाहणी केल्यानंतर भगदाड असल्याने उड्डाण रद्द करण्यात आले. या धडकेत विमानाच्या खालच्या बाजूस असलेल्या ‘फ्युजलाज’ला मोठे भगदाड पडले. विमानाच्या पुढच्या टायरचे आणि पंखाच्या पत्र्याचे नुकसान झाले. त्यामुळे ‘एअर इंडिया’ला हे उड्डाण रद्द करावे लागले.
पुणे विमानतळावरून ‘एअर इंडिया’चे हे विमान दिल्लीसाठी जाणार होते. ‘एरोब्रीज’ला जोडलेले विमान प्रवासी बसल्यावर बाजूला झाले. नेमकी त्याच वेळी ‘पुश बॅक टग’ची धडक विमानाच्या खालच्या बाजूस बसल्याने विमानाचा पत्रा कापला.