नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जत्रा हॉटेल परिसरातील समर्थनगर भागात राहत्या घरात चक्कर येवून पडल्याने ८४ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रघूनाथ वामन क्षिरसागर (रा.स्वामी समर्थ केंद्राजवळ,समर्थ नगर) असे मृत वृध्दाचे नाव आहे. क्षिरसागर गुरूवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात चक्कर येवून पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने मुलगा योगेश क्षिरसागर यांनी त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार मगर करीत आहेत.
२८ वर्षीय युवकाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेलरोड येथील शिवाजीनगर भागात राहणा-या २८ वर्षीय युवकाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शशिकांत निवृत्ती मोरे (रा.शांतीवन सोसा.शिवाजीनगर,जेलरोड) असे मृत युवकाचे नाव आहे. मोरे याने गुरूवारी (दि.१६) सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ राहूल मोरे यांनी त्यास तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रानी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक कुºहाडे करीत आहेत.