मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रचारासाठी अवघा एक दिवस बाकी असतांना मुंबईत महायुती व महाविकास आघाडीच्या सभा होणार आहे. महायुतीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदा एकाच व्यासपीठावर येणार आहे. या सभेवर ठाकरे गटाने एकीकटे टीका केली आहे. तर दुसरीकडे नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळे यांनी थेट या सभेसाठी उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊत यांना यासभेचे आमंत्रण दिले आहे.
काळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत म्हटले आहे. सस्नेह निमंत्रण…मिस्टर उद्धव, मिस्टर आदित्य आणि मनोरुग्ण राऊत यांच्यासाठी शिवतीर्थावर होणाऱ्या आजच्या ऐतिहासिक #मोदीराज सभेच्या स्टेजसमोरील पहिल्या रांगेत ३ जागा आरक्षित ठेवल्या आहेत … लपून,छपून टिव्ही वर सभा बघण्यापेक्षा समोर बसून वंदनीय बाळासाहेबांना अपेक्षित ज्वलंत आणि ज्वाज्वल्य हिंदुत्वाचा अनुभव घ्या …
आता या आमंत्रावरुन ठाकरे गट काय उत्तर देते हे महत्त्वाचे आहे. मुंबईत या दोन्ही सभा आज होणार असल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागले आहे.