नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी शहरातील दोघांना तब्बल ५२ लाखांनाच गंडा घातलण्यात आला आहे. स्टॉक मार्केट कंपनीचे ब्रोकर असल्याचे भासवून गुंतवणुकीवर हा नफा मिळेल असे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुक आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रविंद्र संजय भागवत (रा.भागवत मळा, सामनगावरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भागवत यांच्यासह अन्य गुंतवणुकदारांशी गेल्या मार्च महिन्यात भामट्यांनी संपर्क साधला होता. फिनव्हिजाड टेक्नॉलॉजी प्रा.लिक या स्टॉक मार्केट कंपनीचे ब्रोकर असल्याचे भासवून हा गंडा घालण्यात आला. एफटीपीएल – पीएम हे मोबाईल अॅप डाऊन लोड करण्यास भाग पाडून भामट्यांनी इनस्टीट्यूशल ट्रेडिंग अकाऊंटच्या माध्यमातून स्टॉक ट्रेंडिग व आयपीओ कन्फर्म अॅलोटमेंटचा बहाणा करून गुंतवणुकदारांना अल्पावधीत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
विश्वास बसलेल्या गुंतवणुकदारांना ७ मार्च ते २३ एप्रिल दरम्यान वेगवेगळया बँक खात्यात तब्बल ५१ लाख ७२ हजार ३९४ रूपये ऑनलाईन ट्रान्सफर केले असता ही फसवणुक झाली. महिना उलटूनही नफ्याची आणि मुद्दल पदरात न पडल्याने दोघा गुंतवणुकदारानी संशयितांशी संपर्क केला असता तो होवू शकला नाही. त्यामुळे फसवणुक झालेल्या दोघांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.