नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकीकडे महायुतीत अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरु असतांनाच नाशिकमध्ये त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे. या भेटीबाबत जयंत पाटील यांनी सांगितले की, अशी कोणतीच भेट झाली नाही. तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवार ज्या हॅाटेलमध्ये थांबले होते. येथे तटकरे येऊन गेल्याचे सांगितले. काही कार्यकर्त्यांना ते भेटले. पण, माझी भेट झाली नसल्याचाही त्यांनी स्पष्टीकरण केले.
गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार हे नाशिक जिल्हा दौ-यावर आहे. काल मनमाड येथे सभा संपल्यानंतर ते नाशिक येथील एका हॅाटेलमध्ये मुक्कामी होते. त्यावेळेस ही भेट झाल्याचे बोलले जात आहे. नााशिक येथून तटकरे हे पालघर येथे सभेसाठी रवाना झाले आहे. त्यामुळे त्यांची अद्याप प्रतिक्रिया समोर आली नाही.
खरं तर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले असले तरी त्यांच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरुच आहे. त्यात शरद पवार यांचे दोन्ही गटात आदराचे स्थान आहे. त्यामुळे ते भेटले असले तरी त्यातून काही अर्थ काढण्याची गरज नाही. ती सदिच्छा भेट असू शकते असे एका वरीष्ठ नेत्यांनी सांगितले. पण, त्यांनी ही भेट झाली की नाही याबाबत मला काहीच माहित नाही असेही त्यांनी सांगितले.